Skip to main content
Banner

करारनाम्याचा टप्पा

करार करण्यापूर्वी खालील महत्वाचे व विशेष मुद्दे आपणास माहित असणे आवश्यक आहे

  • विपणन / जाहिरात केलेल्या सेवा व सुविधा करारात समाविष्ट केल्याची खातरजमा करण्यासाठी गृह खरेदीदारांनी करारात नमूद सर्व अटी व शर्तींचे काळजीपूर्वक अध्ययन करण्याचा सल्ला देत आहोत.
  • प्रवर्तकाने सामायिक केलेल्या कराराची प्रत ही महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने आपल्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या विक्री करारनाम्याच्या मुद्दयाशी पडताळून पहावी.
  • आदर्श विक्री करारातील बदलांच्या बाबत अधिक जाणून घेण्यासाठी संकेतस्थळावर अपलोड केलेल्या विचलन अहवालाचे अवलोकन करावे.
  • करारामध्ये सर्व्हे क्र. / भूखंड / शहर भूमापन क्रमांक, प्रकल्पाचा पत्ता, गाळा क्रमांक, चटई क्षेत्र इत्यादी प्रकल्प तपशील अचूक नमूद केले असल्याची खातरजमा करा.