Skip to main content
Banner

अभिकर्त्यांचे प्रशिक्ष

परिचय

स्थावर संपदा क्षेत्रामध्ये प्रवर्तक व वाटपग्राही यांना जोडून देणारे व बहुतांशी स्थावर मालमत्ता व्यवहार सुविधीत करणारे स्थावर संपदा अभिकर्ते हे आवश्यक घटक आहेत. त्यांचे महत्व ओळखून स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम 2016 मध्ये वाटपग्राही व प्रवर्तकांच्या सोबतच स्थावर संपदा अभिकर्त्यांना देखील एक कळीचे घटक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही सदनिका / भूखंड / गाळे / इमारतीची खरेदी किंवा विक्री जाहिरात, विपणनाशी संबंधित कोणत्याही उपक्रमासाठी प्रत्येक स्थावर संपदा अभिकर्त्याने महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन अभिकरणाकडे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. स्थावर संपदा अभिकर्ते हे वाटपग्राहींसाठी महत्वाचे हितसंबंधी आहेत आणि म्हणूनच वाटपग्राहींना मार्गदर्शन करून विवाद टाळण्यासाठी स्थावर संपदा अभिकर्त्यांना स्थावर संपदा क्षेत्रातील व्यवहारांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थावर संपदा अभिकर्त्यांच्या कार्यपद्धतीत किमान सुसूत्रता आणण्यासाठी व नियामक चौकटी व पद्धतींबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने स्थावर संपदा अभिकर्त्यांसाठी क्षमता बांधणी व प्रमाणन कार्यक्रम सुरु केला आहे.

अभ्यासक्रमाची उद्दिष्टे

स्थावर संपदा अभिकर्त्यांना खालील बाबींचे ज्ञान व मार्गदर्शन होण्यासाठी सदर अभ्यासक्रम संरचित केला आहे:

1) स्थावर संपदा नियमन प्राधिकरण अधिनियमाची सर्वांगीण समज व स्थावर संपदा अभिकर्त्याच्या दृष्टीकोनातून त्याचे उपयोजन

2) महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन प्रक्धीकरण व त्यांची कर्तव्ये समजून घेणे

3) स्थावर संपदा क्षेत्रातील सर्व मुलभूत बाबी व पैलूंना समजून घेणे, जेणेकरून स्थावर संपदा उद्योगाबाबत त्यांच्या ज्ञानाचा स्तर उंचावून स्पर्धात्मक क्षमतेत वाढ होईल.

4)स्थावर संपदा उद्योगाशी संबंधित संख्यात्मक संकल्पनांचे ज्ञान असणे

5) स्थावर संपदा उद्योगातील कळीच्या घटकांचे ज्ञान प्राप्त करून कायदेशीर व नैतिक विचार मुरल्यावर व नोंदणी यशस्वीरीत्या झाल्यावर स्थावर संपदा व्यावसायिक म्हणून कामगिरी बजावण्याची क्षमता.

6) ऑनलाईन प्रमाणन प्रयोजनार्थ सादर होण्यासाठी स्थावर संपदा अभिकर्त्यांना सक्षम करणे. सदर प्रशिक्षण हस्तपुस्तिका हे स्थावर संपदा अभिकर्त्यांना केलेले मार्गदर्शन आहे. स्थावर संपदा व्यवसायातील त्यांची महत्वाची भूमिका लक्षात घेता त्यांनी स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम 2016 अतिशय सखोलपणे समजून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून ते संपूर्ण आत्मविश्वासाने व वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती व ज्ञान प्राप्त करून सक्षमतेने व्यवसाय करू शकतील.