Skip to main content
Banner

स्थावर संपदा अभिकर्त्यांना मार्गदर्शन

“स्थावर संपदा अभिकर्ता” म्हणजे स्थावर संपदा प्रकल्पातील यथास्थिती त्याचा भूखंड, सदनिका किंवा इमारत हस्तांतरित किंवा विक्री करण्याच्या व्यवहारात एखाद्या व्यक्तीच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीशी वाटाघाटी करणारी व सदर सेवांबद्दल दलाली अथवा अन्य स्वरुपात मानधन अथवा शुल्क प्राप्त करणारी व्यक्ती व सदर संकल्पनेत कोणत्याही माध्यमातून यथास्थिती भूखंड, सदनिका किंवा इमारत हस्तांतरित किंवा विक्री प्रयोजनार्थ वाटाघाटी करण्यासाठी संभाव्य विक्रेता व खरेदीदारांची एकेमेकांशी गाठ घालून देणाऱ्या संपत्ती क्रयविक्रयी, दलाल मध्यस्थ अशा कोणत्याही नावाने ओळखली जाणारी व्यक्ती समाविष्ट आहे.”

स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम 2016 मधील कलम 9 व उपरोक्त नियम नियम 11 नुसार सदर अधिनियमाच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पातील मिळकतीच्या खरेदी / विक्री, जाहिरात किंवा दलालीशी संबंधित व्यवहार करण्यापूर्वी प्रत्येक स्थावर संपदा अभिकर्त्याने महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडे स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.