Skip to main content
Banner

स्थावर संपदा अभिकर्ता म्हणून नोंदणी होण्यासाठी कसा अर्ज करावा

  • मुख्यपृष्ठ
  • स्थावर संपदा अभिकर्ता म्हणून नोंदणी होण्यासाठी कसा अर्ज करावा

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची स्थावर संपदा अभिकर्ता नोंदणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे. स्थावर संपदा अभिकर्ता म्हणून नोंदणी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील कळीची व महत्वाची माहिती संदर्भित करावी :-

  • महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संस्थालावर अभिकर्ता खाते व्युत्पन्न करावे .
  • नोंदणी झालेल्या खात्यात लॉग इन करून अभिकर्ता नोंदणी अर्जातील विविध भागातील माहिती भरा
  • अनिवार्य दस्तऐवज अपलोड करा .
  • घोषणापत्र स्वीकारून प्रदानाची पद्धत निवडून ऑनलाईन प्रदान करा .
  • यशस्वी प्रदानानंतर अर्ज क्रमांक व्युत्पन्न होईल. छाननीचा मागोवा घेण्यासाठी सदर क्रमांकाचा उपयोग करावा .
  • मान्यतेची प्रक्रिया गतीने होण्यासाठी आपल्या अर्जाचा मागोवा घेत राहा आणि छाननीतील शेऱ्यांचे अनुपालन करा.
  • - प्राधिकरणाने मान्यता दिल्यावर नोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी क्रमांक व्युत्पन्न होईल. स्थावर संपदा अभिकर्त्याच्या खात्यात लॉग इन करून प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.

महारष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर आवश्यक ते शुल्क भरून स्थावर संपदा अभिकर्ते त्यांच्या अंकीय स्वाक्षरी असणाऱ्या नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती करण्यासाठी विनंती करू शकतात.

स्थावर संपदा अभिकर्ते ज्या तपशिलाची दुरुस्ती / परिष्करण करण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाला विनंती करू शकतात, त्याची सूचीमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या परिपत्रक क्रमांक 08 / 2017