Skip to main content
Facilities
Promoter

प्रवर्तक

स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम 2016 अन्वये खालील नमूद प्रकल्प वगळता प्रवर्तकाने सर्व व्यापारी व निवासी स्थावर संपदा प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक आहे:

  • विकसन करावयाच्या जमिनीचे क्षेत्रफळ 500 चौरस मीटर पेक्षा जास्त नसल्यास
  • सर्व टप्पे मिळून विकसित करावयाच्या प्रस्तावित सदनिकांची संख्या आठ पेक्षा जास्त नसल्यास
  • सदर अधिनियम कार्यान्वित होण्यापूर्वी प्रवर्तकाने एखाद्या स्थावर संपदा प्रकल्पाचे पूर्णत्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्यास
  • स्थावर संपदा प्रकल्पातील कोणत्याही सदनिका, भूखंड किंवा इमारतीच्या नुतनीकरण किंवा दुरुस्ती किंवा पुनर्विकसनाशी संबंधित परंतु कुठल्याही प्रकारच्या विपणन, जाहिरात, विक्री किंवा नवीन वाटप समाविष्ट नसलेले स्थावर संपदा प्रकल्प

स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी केल्याशिवाय कोणताही प्रवर्तक कोणत्याही स्थावर संपदा प्रकल्प किंवा त्याच्यातील कोणत्याही यथास्थिती भूखंड, सदनिका किंवा इमारतीची महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही नियोजन क्षेत्रात जाहिरात, विपणन, आरक्षण, विक्री किंवा विक्रीचा देकार देणार नाही. मान्यताप्राप्त आराखड्यानुसार बांधकाम चालू असलेल्या ज्या स्थावर संपदा प्रकल्पांच्या प्रवर्तकांना भोगवटा अथवा पूर्णत्व प्रमाणपत्र न मिळालेल्या प्रकल्पातील इमारतीची किंवा टप्प्यातील इमारतीची नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रवर्तकांनी तिमाही प्रगती अहवाल वेळोवेळी प्राधिकरणाला सादर करणे अनिवार्य आहे

स्थावर संपदा अभिकर्ते

स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम 2016 नुसार कोणतीही विक्री सुविधीत करण्यापूर्वी सर्व स्थावर संपदा अभिकर्त्यांनी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्पाची महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी करताना सदर प्रकल्पातील सदनिकांची विक्री सुविधीत करणाऱ्या स्थावर संपदा अभिकर्त्यांची नावे देखील प्रवर्तकाने देणे आवश्यक आहे. नोंदणी 5 वर्षांसाठी वैध असेल व त्यानंतर त्याचे नुतनीकरण करता येईल.

स्थावर संपदा अभिकर्त्यांना देऊ केलेल्या मूळ सुविधा खालील प्रमाणे आहेत-

  • स्थावर संपदा अभिकर्त्यांची नोंदणी
  • अर्जातील दुरुस्ती
  • स्थावर संपदा अभिकर्त्यांच्या नोंदणीचे नुतनीकरण
  • तक्रारी दाखल करणे
Facilities
Citizens

वाटपग्राही

स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम 2016 अन्वये गृह खरेदीदार व वाटपग्राही यांना खालील सेवा देऊ करण्यात येत आहेत

  • ऑनलाईन तक्रारी सादर करणे
  • नोंदणी झालेल्या प्रकल्पांचे सर्व तपशील ऑनलाईन उपलब्ध

अधिनियमातील तरतुदींचे किंवा त्या अंतर्गत तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास कोणतीही व्यथित व्यक्ती कोणत्याही स्थावर संपदा प्रकल्पाच्या बाबत यथास्थिती प्राधिकरण अथवा अभिनिर्णयन अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करू शकते.