Skip to main content
Banner

प्रवर्तकांना मार्गदर्शन

प्रवर्तकाची व्याख्या

  • अन्य व्यक्तींना सर्व किंवा काही सदनिका विक्री करण्याच्या प्रयोजनार्थ स्वतंत्र इमारत किंवा सदनिका असलेल्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या किंवा सद्य अस्तित्वातील इमारतीचा किंवा तिच्या काही भागाचे सदनिकांमध्ये रूपांतर करणाऱ्या किंवा करवून घेणारी व्यक्ती व त्यामध्ये त्यांचे अभिहस्तांकित समाविष्ट आहेत. ; किंवा
  • सदर प्रकल्पातील सर्व किंवा काही भूखंड अन्य व्यक्तींना त्यावरील संरचनांच्या सह किंवा संरचनांच्या शिवाय विक्री करण्याच्या प्रयोजनार्थ जमिनीचे प्रकल्पात विकसन करून त्यावरील कोणत्याही भूखंडावर संरचना करणारी अथवा न करणारी व्यक्ती ; किंवा
  • कोणतेही विकसन प्राधिकरण किंवा वाटपग्राहींची सार्वजनिक संस्था, ज्यामध्ये—
    (a)सदर प्राधिकरणाच्या किंवा संस्थेच्या मालकीच्या जमिनींवर बांधकाम केलेल्या किंवा विनियोग करण्यासाठी शासनाने त्यांना सोपविलेल्या यथास्थिती इमारती किंवा सदनिका ; किंवा
    (b)सर्व किंवा काही सदनिका किंवा भूखंड विक्री प्रयोजनार्थ सदर प्राधिकरण किंवा संस्थेच्या मालकीचे किंवा शासनाने विनियोग करण्यासाठी सोपविलेले भूखंड ; किंवा
  • आपल्या सभासदांसाठी किंवा सदर इमारती किंवा सदनिकांच्या वाटपग्राहींच्या प्रीत्यर्थ सदनिका किंवा इमारती बांधकाम करणारी राज्य स्तरावरील शीर्षस्थ सहकारी गृहवित्त संस्था व प्राथमिक सहकारी गृहनिर्माण संस्था ; किंवा
  • बांधकाम व्यावसायिक, वसाहत वसविणारा, कंत्राटदार, विकासक, स्थावर मालमत्ता विकासक किंवा अन्य कोणत्याही नावाने कार्यरत असणारी किंवा ज्या जमिनीवर इमारत किंवा इमारती बांधावयाच्या आहेत किंवा भूखंड विक्रीसाठी विकसित करावयाचा आहे अशा जमीन किंवा भूखंडाच्या मालकाकडून मुखत्यारनामा धारक असल्याचा दावा करणारी व्यक्ती. ; किंवा
  • सर्वसामान्य जनतेला विक्री करण्यासाठी इमारत किंवा सदनिकांचे बांधकाम करणारी तत्सम अन्य व्यक्ती.

स्पष्टीकरण. सदर परिच्छेदाच्या प्रयोजनार्थ जिथे इमारतीचे बांधकाम करणारी किंवा करून इमारत सदनिकांमध्ये रुपांतर करणारी किंवा भूखंड विक्रीसाठी विकसित करणारी व्यक्ती व भूखंड व सदनिकांची विक्री करणारी व्यक्ती वेगवेगळी असेल तर दोघांनाही संयुक्तरित्या प्रवर्तक म्हणून मानण्यात येईल व सदर अधिनियमात किंवा त्याच्या अंतर्गत तयार केलेल्या नियम व विनियमात विनिर्दिष्ट केलेल्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासाठी उपरोक्त दोन्ही व्यक्ती संयुक्तपणे उत्तरदायी असतील;

नोंदणीची अनिवार्यता

  • सदर अधिनियमाच्या अंतर्गत स्थापित स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी केल्याशिवाय कोणताही प्रवर्तक कोणत्याही स्थावर संपदा प्रकल्प किंवा त्याच्यातील कोणत्याही यथास्थिती भूखंड, सदनिका किंवा इमारतीची महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही नियोजन क्षेत्रात जाहिरात, विपणन, आरक्षण, विक्री किंवा विक्रीचा देकार देणार नाही किंवा खरेदी करण्यासाठी व्यक्तींना निमंत्रित करणार नाही:
  • शिवाय असे की सदर अधिनियम कार्यान्वित होण्याच्या दिनांकास बांधकाम सुरु असलेल्या व पूर्णत्व प्रमाणपत्र जारी न झालेल्या प्रकल्पांची नोंदणी करण्यासाठी प्रवर्तक अधिनियम कार्यान्वित झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत सदर प्रकल्प नोंदणी करण्यासाठी प्राधिकरणाकडे अर्ज सादर करेल:
  • शिवाय असे की वाटपग्राहींचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी नियोजन क्षेत्राच्या बाहेर पण स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीने विकसित होत असलेल्या प्रकल्पाची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणाची धारणा झाल्यास प्राधिकरण एका आदेशाद्वारे सदर प्रकल्प प्राधिकरणाकडे नोंदणी करण्याबाबत संबंधित प्रवर्तकाला निर्देशित करू शकते व नोंदणीच्या सदर टप्प्यापासून प्रकल्पाला सदर अधिनियम किंवा त्या अंतर्गत तयार केलेले नियम व विनियम लागू होतील

नोंदणीतून सूट

उपकलम ( १ ) मध्ये काहीही म्हटले असले तरीही खालील स्थावर मालमत्ता प्रकल्पांची नोंदणी करण्याची गरज नाही—

  • जिथे विकसन प्रस्तावित असलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ पाचशे चौरस मीटर पेक्षा कमी असेल किंवा सर्व टप्पे मिळून सदनिकांची संख्या आठ पेक्षा जास्त नसेल असे प्रकल्प ; शिवाय असे की यथोचित शासनाला आवश्यक वाटल्यास सदर अधिनियमाच्या अंतर्गत नोंदणीतून सूट देण्यासाठी ते सदर मर्यादा यथास्थिती पाचशे चौरस मीटर क्षेत्रफळ किंवा सर्व टप्पे मिळून सदनिकांची संख्या आठ पेक्षा कमी करू शकतात;
  • सदर अधिनियम कार्यान्वित होण्यापूर्वी प्रवर्तकाने एखाद्या स्थावर संपदा प्रकल्पाचे पूर्णत्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्यास;
  • स्थावर संपदा प्रकल्पातील कोणत्याही सदनिका, भूखंड किंवा इमारतीच्या नुतनीकरण किंवा दुरुस्ती किंवा पुनर्विकसनाशी संबंधित परंतु कुठल्याही प्रकारच्या विपणन, जाहिरात, विक्री किंवा नवीन वाटप समाविष्ट नसलेले स्थावर संपदा प्रकल्प

स्पष्टीकरण. सदर कलमाच्या प्रयोजनार्थ , जिथे स्थावर संपदा प्रकल्प हा टप्प्यांमध्ये विकसित होत असेल, तिथे प्रत्येक टप्पा हा एकल स्थावर संपदा प्रकल्प मानण्यात येईल व सदर अधिनियमाच्या अंतर्गत प्रवर्तकाने प्रत्येक टप्प्यासाठी वेगळी नोंदणी करणे आवश्यक आहे..