Skip to main content
Banner

नवीन प्रकल्पांची नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन

नवीन प्रकल्पांची नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन

  • Stage wise guidance
    1. प्रकल्प नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज व नमुना अर्जांची सूची

    स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी करण्याच्या वेळेस प्रवर्तकाने खालील दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे-

  • Stage wise guidance
    2. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर उपयोगकर्ता खाते व्युत्पन्न करणे

    प्रवर्तकाचे खाते व्युत्पन्न करण्यासाठी मूळ मुद्दे-

    • महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपयोगकर्ता लॉग इन बटनावर क्लिक करावे.
    • “ नवीन नोंदणी “ पर्याय निवडा.
    • उपयोगकर्ता म्हणून “ प्रवर्तक “ हा पर्याय निवडून त्यामध्ये आवश्यक माहितीचे तपशील प्रविष्ट करा.
    • तपशील सादर करण्यासाठी “ उपयोगकर्ता व्युत्पन्न करा “ या बटनावर क्लिक करावे.
    • आपल्या नोंदणीकृत ई मेल पत्त्यावर प्राप्त पडताळणी जोडणीद्वारे व्युत्पन्न झालेले खात्याची पडताळणी करा.
  • Stage wise guidance
    3. प्रकल्पाचे तपशील जोडायचे

    प्रकल्पाचे तपशील समाविष्ट करण्यासाठी मूळ मुद्दे-

    • माझे खाते अंकुशामध्ये लॉग इन करून प्रवर्तकांचे तपशील प्रविष्ट करा
    • प्रत्यक भागातील प्रकल्प तपशील अंकुशात प्रकल्पाची माहिती भरा
    • भरलेली सर्व माहिती अचूक व महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या नियम, विनियम, आदेश व परिपत्रकानुसार भरल्याची खातरजमा करा.
    • प्रदान अंकुशाच्या अंतर्गत माहितीची पुनरावलोकन करून घोषणापत्रावर मान्य असल्याची खुण करा.
    • “ प्रदाने करा “ बटनवर क्लिक करुन प्रदान भागात शिरा. प्रदानाची पद्धती निवडा.प्रदानाची पद्धती निवडा.
  • Stage wise guidance
    4. प्रकल्प नोंदणी अर्जाचा मागोवा घेणे

    प्रवर्तकाच्या खात्यात लॉग इन करून नियंत्रण पट्टावरील नोंदणी अर्जाची छाननी अंतर्गत आपण आपल्या अर्जाच्या वाटचालीचा मागोवा घेऊ शकता.

    विधी, वित्त व तांत्रिक विभाग हे प्रकल्प नोंदणी अर्जाची छाननी करतील. अर्जात काही त्रुटी असल्यास प्रवर्तकांना ई मेल / लघु संदेशाच्या माध्यमातून तसे कळविले जाईल व छाननीचे शेरे प्रवर्तकाच्या नियंत्रण पट्टावर प्रदर्शित होतील.

    मान्यतेची प्रक्रिया जलद होण्यासाठी आपल्या अर्जाचा मागोवा घ्या व छाननीतील शेऱ्यांचे अनुपालन करा.

    छाननीचे सर्व अनुपालन पूर्ण झाल्यावर प्रकल्पाचे प्रमाणपत्र व्युत्पन्न होईल व प्रकल्प नोंदणी क्रमांक जारी करण्यात येईल.

  • Stage wise guidance
    5. नोंदणी प्रमाणपत्र डाउनलोड करा

    आपल्या खात्यात लॉग इन करून प्रवर्तक प्रकल्प नोंदणी प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात.

    अथवा नोंदणी झालेले प्रकल्प शोधा अंकुशाचा उपयोग करून सार्वजनिक अधिक्षेत्रातून प्रवर्तक प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात.