Skip to main content
Banner

प्रकल्पाचे तपशील अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन

  • मुख्यपृष्ठ
  • प्रकल्पाचे तपशील अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन

स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम २०१६ मधील कलम ११ नुसार प्रकल्पाची अद्ययावत माहिती उपलब्ध असल्याची खातरजमा करण्याची सूचना प्रवर्तकांना करण्यात येत आहे. ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधीत माहिती अद्ययावत झालेली नसल्यास महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण त्यांना आवश्यक वाटेल अशी कार्यवाही करेल.

एकदा नोंदणी झाल्यावर नोंदणी करण्याच्या वेळेस अपलोड झालेले दस्तऐवज हटविता येणार नाही. त्यानंतरच्या नियमित / तिमाही / वार्षिक कालावधीनंतर अद्ययावत करताना प्रवर्तक हे संबंधित अंकुशात / कार्यक्षेत्रात अतिरिक्त दस्तऐवज समाविष्ट करू शकतात आणि सदर अतिरिक्त दस्तऐवज एकदा अपलोड केल्यावर मागे घेता / हटविता येणार नाहीत.

प्रकल्पाचे तपशील अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन

प्रकल्पाचे तपशील अद्ययावत करण्याचा पहिला टप्पा म्हणून प्रवर्तकांनी प्रकल्प नोंदणी करताना व्युत्पन्न केलेल्या लॉग इनचा वापर करून वार्षिक अद्यायावतीकारण शुल्काचा भरणा करावा. प्रदान यशस्वी झाल्यावर प्रकल्प अद्ययावत करण्याची सुविधा कार्यान्वित होईल.

सामान्यत खालील भागात माहिती अद्ययावत करण्याची गरज भासू शकते

  • दस्तऐवज अपलोड करणे (दस्तऐवज, प्रमाणपत्र, बोजांचे तपशील इत्यादी.)
  • बांधकामाचे तपशील (आरक्षित / विक्री / वाटप झालेल्या सदनिकांची संख्या)
  • कार्य / उपक्रम (कामाची टक्केवारी)
  • प्रकल्पाचा खर्च (प्रत्यक्ष एकूण रक्कम)
  • प्रवर्तक (जमीन मालक) / गुंतवणूकदारांचे तपशील
  • सामाईक क्षेत्र व सुविधा (आरक्षित केलेले गाळे, काम पूर्ण झाल्याची टक्केवारी)
  • प्रकल्पातील व्यावसायिकांचे तपशील(स्थावर संपदा अभिकर्ते इत्यादी.)
  • इमारत निहाय पूर्णत्वाचा दिनांक: -

इमारती समाविष्ट करा अंकुशातील प्रकल्प तपशीलात इमारत निहाय पूर्णत्वाचा दिनांक अद्ययावत करा (सदर दिनांक हा सुधारित प्रस्तावित पूर्णत्वाच्या दिनांकाच्या पलीकडील नसेल)