Skip to main content
Banner

दुरुस्ती अर्जासाठी मार्गदर्शन

दुरुस्ती विमानकाच्या अंतर्गत अर्ज करून प्राधिकरणाच्या मान्यतेची गरज असलेल्या नोंदणीकृत प्रकल्पाच्या तपशिलात प्रवर्तक दुरुस्ती करू शकतात.

अंकीय स्वाक्षरी असलेल्या नोंदणी प्रमाणपत्रात व प्रकल्प अद्ययावतीकरणात सादर न केलेल्या तपशिलाची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक ते शुल्क भरणा करून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेत स्थळाद्वारे दुरुस्तीसाठी वेगळी विनंती करावी लागेल. प्रवर्तक ज्या तपशिलात बदल करू शकतात आणि ज्या तपशीलात महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने बदल करायचा आहे त्याचे विवेचन परिशिष्ट अ मध्ये नमूद केला आहे. (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे दिनांक 17 जुलै 2017 चे परिपत्रक क्रमांक ०8 / 2017)

 

(व दिनांक 1 नोव्हेंबर 2017 चे परिपत्रक क्रमांक 14 / 2017 चे अवलोकन करावे)

 

प्रकल्प तपशीलातील दुरुस्ती -

प्राधिकरणाकडून मान्यता घेऊन टंकलेखनातील किंवा मानवी चुका दुरुस्त करता येतील. जो तपशील अद्ययावत करता येईल आणि ज्या तपशिलात दुरुस्ती करण्यासाठी प्राधिकरणाच्या मान्यतेची गरज आहे त्यांची सूची (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे दिनांक १७ जुलै २०१७चे परिपत्रक क्रमांक ०८ / २०१७ सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केली आहे.)

कलम १४ ( २ ) अन्वयेचे बदल -

मान्यताप्राप्त आराखडे, अभिन्यास आराखडे व इमारतीतील विनिर्धिष्ट किंवा सामाईक क्षेत्रातील महत्वाच्या बदल किंवा समावेशनास किमान दोन तृतीयांश वाटपग्राहींनी लेखी स्वरुपात संमती देणे कलम १४ ( २ ) नुसार अनिवार्य आहे.

मान्यताप्राप्त आराखड्यात बदल / दुरुस्ती / परिष्करणासाठी वाटपग्राहींच्या संमतीचा विहित नमुना क(महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे दिनांक ८ मार्च २०२१चे परिपत्रक क्रमांक २८ / २०२१ सोबत जोडले आहे.)

प्रवर्ताकातील बदल

स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम २०१६ च्या कलम १५ नुसार प्रवर्तक वगळून दोन तृतीयांश वाटपग्राहींच्या लेखी पूर्वसंमती व प्राधिकरणाच्या पूर्व लेखी सहमती शिवाय प्रवर्तक स्थावर संपदा प्रकल्पातील बहुतांश अधिकार व दायित्वे त्रयस्थ पक्षकाराला हस्तांतरित करू शकणार नाहीत.

प्रवर्तक बदलासाठी दुरुस्ती अर्ज करण्यासाठी प्रवर्तकांनी (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे दिनांक ४ जुन २०१९ चे परिपत्रक क्रमांक २४ / २०२१ व दिनांक २३ जुलै २०२१ चे परिपत्रक क्रमांक २४ अ / २०२१ मधील विहित प्रक्रियेचा अवलंब करावा.)

प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात दुरुस्ती

नमुना – १ – वास्तूविशारदाचे प्रमाणपत्र, नमुना २ – अभियंत्याचे प्रमाणपत्र व नमुना ३ – सनदी लेखापालाचे प्रमाणपत्र हे पाठबळ दस्तऐवज म्हणून जोडून प्रवर्तक अंदाजित खर्चात बदल करू शकतील

दुरुस्ती अर्जासाठी कसा अर्ज करायचा

खालील मूळ मुद्दे अनुसरून प्रकल्प उपयोजनातील दुरुस्तीच्या विमानकाचा वापर करता येईल

  • उपयोगकर्ता नाव व संकेतशब्द वापरून खात्यात लॉग इन करा.
  • प्रकल्प तपशिलाच्या ड्रोप डाऊन मधून “ दुरुस्तीसाठी अर्ज “ अंकुशावर क्लिक करावे व प्रकल्पाची निवड करा.
  • विविध भागातील लागू व आवश्यक तपशील अद्ययावत करा व त्यास पाठबळ देणारे दस्तऐवज अपलोड करा. प्रमाणपत्रात समाविष्ट तपशिलात बदल करण्यासाठी विनंती असल्यास “ सुधारित नोंदणी प्रमाणपत्र व्युत्पन्न करण्यासाठी विनंती “ हा पर्याय निवडा.
  • आवश्यक त्या बदलांची पडताळणी केल्यावर बदलांचे पुनरावलोकन करण्यासाठी “ बदल पूर्वावलोकन बटन “ वर क्लिक करा व त्यानंतर प्रदान बटन वर क्लिक करुन शुल्क भरण्यासाठी प्रदानाची योग्य पद्धती निवडा.
  • प्रदान यशस्वीपणे केल्यावर दुरुस्ती अर्ज क्रमांक व्युत्पन्न होईल व प्रदानाच्या पावत्या डाउनलोड विभागात ती दिसून येईल.
  • प्रवर्तकाच्या नियंत्रण पट्टीवर छाननीच्या प्रक्रियेचा मागोवा घ्या.