Skip to main content
Banner

स्थावर संपदा अभिकर्त्यांना मार्

स्थावर संपदा क्षेत्रामध्ये प्रवर्तक व वाटपग्राही यांना जोडून देणारे व बहुतांशी स्थावर मालमत्ता व्यवहार सुविधीत करणारे स्थावर संपदा अभिकर्ते हे आवश्यक घटक आहेत. त्यांचे महत्व ओळखून स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम २०१६ मध्ये वाटपग्राही व प्रवर्तकांच्या सोबतच स्थावर संपदा अभिकर्त्यांना देखील एक कळीचे घटक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

व्याख्या व तरतुदी-

“स्थावर संपदा अभिकर्ता ” म्हणजे स्थावर संपदा प्रकल्पातील यथास्थिती त्याचा भूखंड, सदनिका किंवा इमारत हस्तांतरित किंवा विक्री करण्याच्या व्यवहारात एखाद्या व्यक्तीच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीशी वाटाघाटी करणारी व सदर सेवांबद्दल दलाली अथवा अन्य स्वरुपात मानधन अथवा शुल्क प्राप्त करणारी व्यक्ती व सदर संकल्पनेत कोणत्याही माध्यमातून यथास्थिती भूखंड, सदनिका किंवा इमारत हस्तांतरित किंवा विक्री प्रयोजनार्थ वाटाघाटी करण्यासाठी संभाव्य विक्रेता व खरेदीदारांची एकेमेकांशी गाठ घालून देणाऱ्या संपत्ती क्रयविक्रयी, दलाल मध्यस्थ अशा कोणत्याही नावाने ओळखली जाणारी व्यक्ती समाविष्ट आहे.”

स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) अधिनियम 2016 मधील कलम 9 व उपरोक्त नियम नियम 11 नुसार सदर अधिनियमाच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पातील मिळकतीच्या खरेदी / विक्री, जाहिरात किंवा दलालीशी संबंधित व्यवहार करण्यापूर्वी प्रत्येक स्थावर संपदा अभिकर्त्याने महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडे स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.

स्थावर संपदा अभिकर्त्याची कर्तव्ये

कलम ९ अन्वये नोंदणी झालेला प्रत्येक स्थावर संपदा अभिकर्ता

  • प्राधिकरणाकडे नोंदणी न झालेल्या व विक्रेत्याकडून विक्री केल्या जात असलेल्या कुठल्याहि नियोजन क्षेत्रातील स्थावर संपदा प्रकल्पातील किंवा त्याच्या भागातील यथास्थिती कोणत्याही भूखंड, सदनिका किंवा इमारतीची विक्री किंवा खरेदी सुविधीत करणार नाही;
  • विहित केल्यानुसार हिशेबाची पुस्तके, नोंदी व दस्तऐवज ठेवून त्यांचे संवर्धन करेल.
  • खालील पैकी कोणत्याही अनुचित व्यापार पद्धतीत स्वतः सहभागी होणार नाही : -
  • सेवा एका विशिष्ट दर्जा किंवा प्रमाणाच्या असल्याचे चुकीचे चित्र उभे करणारी मौखिक, लेखी प्रतिपादने किंवा दृश्य पद्धतीने दर्शविणारी एखादी प्रथा अथवा पद्धती.
  • प्रवर्तकाकडे किंवा स्वतःकडे नसलेली एखादी संलग्नता किंवा मान्यता असल्याचे दर्शविणे .
  • सेवांशी संबंधित चुकीचे किंवा दिशाभूल करणारे प्रतिपादन करणे
  • ज्या सेवा देऊ करण्याचे कोणतेही उद्दिष्ट नाही अशा सेवांच्या जाहिराती वर्तमानपत्रे किंवा अन्यथा प्रकाशित करण्यास परवानगी देणे
  • यथास्थिती कोणताही भूखंड, सदनिका किंवा इमारत आरक्षित करताना वाटपग्राहीला जी माहिती व दस्तऐवज मिळण्याचा अधिकार आहे, ती सर्व सुविधीत करणे;
  • अन्य विहित कर्तव्यांचे निर्वाहन करणे.