Skip to main content
Banner

महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडे अभिकर्ता नोंदणी बाबतच्या ठळक बा

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडे अभिकर्ता नोंदणी बाबतच्या ठळक बा

अन्यथा रद्द होईपर्यंत स्थावर संपदा अभिकर्त्याची नोंदणी ५ वर्षे कालावधी पर्यंत वैध असेल. नोंदणी झालेल्या अभिकर्त्याने हिशेब, हिशेबाची पुस्तके व नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचे विहित करण्यात येत आहे.

नोंदणी प्राप्त केल्यावर माहितीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास दुरुस्ती अर्ज सादर करून सदर सुविधेचा लाभ घेता येईल. अभिकर्त्याच्या उपयोगकर्ता खात्यातील उपलब्ध असलेल्या अर्ज बदल सदराचा अभिकर्ता दुरुस्ती अर्जासाठी वापर करू शकतो.

अधिनियमाच्या अंतर्गत स्थावर संपदा अभिकर्त्याला बहाल करण्यात आलेली नोंदणी संबंधित स्थावर संपदा अभिकर्त्याकडून अर्ज प्राप्त झाल्यास नुतनीत करावी. अभिकर्त्याच्या उपयोगकर्ता खात्यात ऑनलाईन नोंदणी नुतनीकरण अर्ज उपलब्ध आहे. नुतनीकरण अंतर्गत स्थावर संपदा अभिकर्ते नूतनीकरणासाठी अर्ज सादर करू शकतात.