Skip to main content
Banner

नोंदणी झालेल्या प्रकल्पाबाबत गाऱ्हाणी सादर कर

  • मुख्यपृष्ठ
  • नोंदणी झालेल्या प्रकल्पाबाबत गाऱ्हाणी सादर कर

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या आवेदन संस्थळावर कोणतीही व्यथित व्यक्ती आपले उपयोगकर्ता खाते व्युत्पन्न करून स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अधिनियमाच्या कलम 31 नुसार प्रतिवादीच्या नोंदणी केलेल्या प्रकल्पाबाबत तक्रार सादर करू शकतो. ( कलम 31 चा संदर्भ घ्यावा)

टीप :तक्रारदाराचे पार्श्वचित्र नोंदणी करताना तक्रारदाराला समेट मंचाकडे जाण्याची मुभा देणारा खालील संदेश प्रदर्शित होईल.

“ तटस्थ मध्यस्थांच्या मदतीने आपसात सहमती होईल अशा पद्धतीने विवादाचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचा समेट मंच आपल्याला सहाय्य करू शकेल. आपली त्यास सहमती आहे काय ?”

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या समेट मंचाचे नोंदणी पृष्ठ उघडण्यासाठी “ होय “ बटन वर क्लिक करा. समेटासाठी मार्गदर्शन मिळण्यासाठी येथे क्लिक करा.

तक्रारदाराने “ नाही “ बटन वर क्लिक केल्यास तक्रारदाराला तक्रार लॉग इन पृष्ठाकडे निर्देशित करण्यात येईल.

महाराष्ट्र स्थावर संपदा ( नियमन व विकसन ) ( व्याज, शास्ती, नुकसानभरपाईची वसुली व शास्तीचे प्रदान, तक्रारींचे नमुने व अपील इत्यादी ) नियम 2017 अन्वये नमुना ए हा तक्रारीचा नमुना म्हणून विहित करण्यात आला आहे. तक्रार ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

तक्रारदाराचे लॉग इन व्युत्पन्न झाल्यावर नमुना अ उपलब्ध होईल. दिनांक 17 जुलै 2018 रोजी जारी परिपत्रक क्रमांक 18 / 2018 अन्वये महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने प्रमाणित परिचालन प्रक्रिया स्थापित केली आहे. सदर परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी झालेल्या प्रकल्पाच्या बाबतच तक्रार दाखल करता येईल. ऑनलाईन तक्रार दाखल करताना तक्रारदारांनी खालील प्रमाणे तपशील सादर करणे आवश्यक आहे ; k

  • इमारत क्रमांक / भाग क्रमांक / सदनिका क्रमांक / दुकान क्रमांक / गाळा क्रमांक.
  • सर्व मालक / सहमालकांच्या नावांची सूची
  • एकूण मोबदला मूल्य ( रुपये )
  • आतापर्यंत भरणा केलेली रक्कम
  • वाटप किंवा आरक्षणाची तारीख
  • कराराचा दिनांक ( असल्यास )
  • 7.करारातील ताब्याचा दिनांक ( असल्यास )

ऑनलाईन तक्रार सादर करताना महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या दिनांक 23 ऑक्टोबर 2019 रोजी जारी आदेश क्रमांक 11 / 2019 व दिनांक 28 मार्च 2022 रोजी जारी परिपत्रक क्रमांक 41 मधील विहित निर्देशांचा संदर्भ घ्यावा. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या सदर आदेश व सदर परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लि‍‍क करा.

and (said Circular)

व्यथित व्यक्तीने वेगळे तक्रार सादर केले पाहिजे.

स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या कलम 7 व 8 अन्वये किंवा सामाईक सुविधांच्या प्रीत्यर्थ दावित सामाईक अनुतोषाच्या बाबतीतच गट तक्रार ऐकण्यात येईल.

ऑनलाईन तक्रार दाखल करण्याच्या प्रयोजनार्थ तक्रारदाराने तक्रारीचा अर्ज ऑनलाईन भरून त्यामध्ये विहित पद्धतीने तक्रारीशी संबंधित सर्व दस्तऐवज अपलोड करणे व त्यानंतर आवश्यक प्रदान करणे आहे.

एकदा प्रदान केल्यावर तक्रारदार व प्रवर्तकाला इमेल द्वारे अधिसूचित करण्यात येईल. टप्पे निहाय सूचनांसाठी संसाधन स्त्रोतातील तक्रारदारासाठी असलेल्या हस्तपुस्तिकेचा संदर्भ घ्यावा

ज्येष्ठतेनुसार व दिनांक 21 जून 2021 रोजी जारी परिपत्रक क्रमांक 34 / 2021 नुसार विहित मार्गदर्शक सूचनांच्या नुसार तक्रार सुनावणीसाठी हाती घेतली जाईल. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या प्रणालीत नोंदविलेल्या ई मेल पत्त्यावर सुनावणीची सूचना ऑनलाईन पाठविण्यात येईल. सदर माहिती पक्षकारांच्या नियंत्रण पट्टात प्रतिबिंबित झाल्यावर सुनावणीची सूचना सर्व पक्षकारांवर बजावण्यात आल्याचे मानण्यात येईल. त्यामुळे तक्रारदारांनी व प्रतिवादी प्रवर्तकांनी सुनावणीचा दिनांक, अंतरिम व अंतिम आदेश यासह तक्रारीतील प्रगतीची माहिती करून घेण्यासाठी नियमितपणे आपल्या ऑनलाईन नियंत्रण पट्टाचे संनियंत्रण करण्यास विनंती आहे.

सुनावणीच्या पहिल्या दिनांकास दोन्ही पक्षकारांनी प्रकरण मिटविण्यास संमती दर्शविल्यास तक्रार समेट मंचाकडे हस्तांतरित करण्यात येईल. जर पक्षकार समेटाने प्रकरण मिटविण्यास राजी नसतील तर ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार पुढील सुनावणी आयोजित करण्यात येईल.

सुविधा दस्तऐवज संच सादर करणे

एकदा ऑनलाईन तक्रार दाखल झाल्यावर तक्रारदार 20 पृष्ठांपेक्षा जास्त नसलेला सुविधा दस्तऐवज संच सादर करेल. दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी जारी आदेश क्रमांक 23 व दिनांक7 डिसेंबर 2021 रोजी जारी आदेश क्रमांक 27 चा संदर्भ घ्यावा. C आदेश क्रमांक 23 / 2021 व 27 / 2021 पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Click here to view the Order No. 23/2021) and (Click here to view the Order No. 27/2021)

तक्रारींचे परीक्षण व छाननी

तक्रारदाराने ऑनलाईन तक्रार दाखल केल्यावर प्राधिकरणाचा नोंदणी विभाग ऑनलाईन दाखल झालेल्या तक्रारीचे परीक्षण व छाननी करेल. सोबत जोडलेल्या तपासणी सूचीचे अनुपालन तक्रारीत होत नसल्याचे नोंदणी विभागाला आढळल्यास तसे तक्रारदाराला कळविण्यात येईल व सर्व त्रुटी दूर करून घेण्यात येतील.

तक्रारदाराने त्रुटी दूर केल्यावर नोंदणी विभाग तक्रार प्रधीकरणाच्या संबंधित पीठाकडे सुपूर्द करेल. प्राधिकरणाच्या संबंधित पीठाकडे तक्रार सुपूर्द केल्यावर तक्रारीचे तपशील प्रतिवादीच्या प्रकल्प नोंदणी नियंत्रण पट्टात प्रदर्शित होईल. तक्रारीबाबत उत्तर किंवा दस्तऐवज अपलोड करण्याची मुभा प्रतीवादीला असेल.

तक्रारीची सुनावणी

एकदा नोंदणी विभागाने प्राधिकरणाच्या विशिष्ट पीठाकडे तक्रार सुपूर्द केल्यावर ज्येष्ठता क्रमानुसार तक्रारीची सुनावणी होईल. दिनांक २१ जून २०२१ रोजी जारी परिपत्रक क्रमांक ३४ नुसार ज्येष्ठता क्रम निर्धारित करण्यात येईल .

सुनावणीच्या पहिल्या दिवशी दोन्ही पक्षकारांनी प्रकरणाचे समेटाने निराकरण करण्यास संमती दर्शविल्यास तक्रार समेट मंचाकडे हस्तांतरित करावी. पक्षकार समेट करू इच्छित नसल्यास तक्रार गुणवत्ता व ज्येष्ठतेनुसार सुनावणीसाठी मुक्रर करण्यात यावी.

सुनावणीच्या दरम्यान पक्षकारांना त्यांचे जबाब / प्रत्यूत्तर / लेखी सादरीकरण दाखल करण्याची मुभा राहील. संबंधित पक्षकारांनी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे.

सुनावणीच्या दरम्यान पक्षकारांना तक्रारीत दुरुस्ती, किरकोळ अर्ज इत्यादी संबंधी दस्तैवज महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची मुभा असेल. सदर अर्ज स्वीकारायचे किंवा नाकारायचे हे प्राधिकरण आपल्या स्वेछाधिकारात निर्धारित करेल.

प्रत्येक सुनावणीचा रोजनामा महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल. तक्रारदाराला तक्रारीच्या संकेत स्थळावर किंवा प्रतिवादी प्रवर्तक असल्यास प्रकल्प नोंदणी संकेत स्थळावर पक्षकारांना त्याचे तपशील दिसतील.

एकाच प्रकल्पाच्या संदर्भात अनेक तक्रारी असल्यास प्राधिकरण त्यांच्या स्वेछाधिकारात सर्व तक्रारींची एकत्रित सुनावणी घेऊ शकेल.

तक्रारीतील सर्व युक्तिवाद व कामकाज पूर्ण झाल्यावर प्राधिकरण तक्रारीवरील निर्णय राखून ठेवेल.

पक्षकारांची उपस्थिती

तक्रारदार व्यक्तीशः किंवा प्रतिनिधी नेमून त्याच्याद्वारे सुनावणीसाठी उपस्थित राहू शकतात. आपल्या वतीने सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी तक्रारदार अधिवक्ता, सनदी लेख्पाल किंवा अन्य व्यक्तीची नेमणूक करू शकतात. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या सर्वसामान्य नियमावलीतील नमुना 6 नुसार तक्रारदाराने अधिवक्त्याच्या बाबतीत वकालतनामा किंवा अधिवक्त्याच्या व्यतिरिक्त अन्य अन्य व्यक्तींच्या बाबतीत प्राधिकार पत्र अपलोड करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण सर्वसामान्य नियमावली 2017 पाहण्यासाठी येथे क्लिक करा . (Click here to view the MahaRERA General Regulations, 2017.)

तक्रारींवर आदेश

प्राधिकरणाच्या संबंधित पीठाने आदेश जारी केल्यावर तो महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. सदर आदेश तक्रारदार व प्रवर्तकांना त्वरित अभिगम्य असेल व संबंधित पक्षकारांना इ मेल द्वारे अधिसूचित करण्यात येईल.

आदेशात सुधारणा

आदेश पारित केल्यावर एखाद्या पक्षाकाराला त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास व्यथित पक्षकार आदेशात सुधारणा करण्यासाठी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर अधिनियमाच्या कलम 39 नुसार प्राधिकरणाच्या अध्यक्षीय खंडपीठाच्या मान्यतेच्या अधीन राहून आदेशात सुधारणा करण्यात यावी.

आदेशाचे पुनरावलोकन

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या सर्वसामान्य नियमावली 2017 मधील नियम 36 नुसार कोणताही व्यथित पक्षकार प्राधिकरणाकडून पारित आदेशाचे पुनरावलोकन होण्यासाठी अर्ज दाखल करू शकतो. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने आदेश जारी केल्यानंतर 45 दिवसांच्या आत पुनरावलोकन होण्यासाठी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. तसेच तक्रार ज्या पद्धतीने दाखल केली, त्याच पद्धतीने पुनरावलोकन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. प्राधिकरण त्यांच्या स्वेछाधिकारात पुनरावलोकन अर्ज स्वीकारू किंवा नाकारू शकते. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण सर्वसामान्य नियमावली 2017 पाहण्यासाठी येथे ‍क्लिक करा.

प्रमाणित प्रती जारी करणे

तक्रार संकेत स्थळावर किंवा प्रतिवादी प्रवर्तक असल्यास प्रकल्प नोंदणी संकेत स्थळावर लॉग इन करून पक्षकार आदेशाची प्रमाणित प्रत मिळण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात.

तक्रार किंवा प्रकल्प नोंदणी संकेत स्थळ अभिगम्य नसलेल्या पक्षकारांनी आदेशांची प्रमाणित प्रत मिळण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या सर्वसामान्य नियमावली 2017 मधील नमुना 7 नुसार अर्ज दाखल करू शकतात. (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण सर्वसामान्य नियमावली 2017 पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

आदेशांचे अनुपालन न झाल्यास

प्रतिवादीने आदेशांचे अनुपालन न केल्यास तक्रारदार त्याबाबत महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे अर्ज करू शकतात. तक्रारदाराने तक्रार संस्थळावर लॉग इन करून व त्यातील “ बिगर निष्पदनासाठी अर्ज करा “ या सदरात क्लिक करुन सदर बिगर अनुपालनाचा अर्ज दाखल करावयाचा आहे. सदर आदेशाची मुदत समाप्त झाल्यावर 60 दिवसानंतर सदर बिगर अनुपालन सदर उपलब्ध राहील.

सदर अर्ज प्राप्त झाल्यावर ज्येष्ठतेनुसार सदर अर्जांवरील सुनावणी अनुसूचित करण्यात येईल. बिगर अनुपालन अर्जांच्या दाखल दिनांकानुसार ज्येष्ठता निर्धारित करण्यात येईल.

स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अधिनियमाच्या कलम 40 ( 1 ) मधील तरतुदीनुसार प्राधिकरण स्वेछाधिकारात वसुली अधिपत्र जारी करण्यासाठी आदेशित करू शकते.