Skip to main content
Banner

वाटपग्राहींचे अधिकार व कर्तव्ये

अधिनियमाच्या कलम १९ नुसार वाटपग्राहींचे अधिकार खालील प्रमाणे आहेत.

  • अधिनियम किंवा त्यांतर्गत तयार केलेल्या नियम व विनियम किंवा प्रवर्तकाच्या सोबत स्वाक्षरीत केलेल्या विक्री करारातील सक्षम प्राधिकरणाकडून मान्यता प्राप्त झालेले आराखडे, विनिर्दिष्टांसह अभिन्यास आराखडे व अन्य माहिती जाणून घेण्याचा वाटपग्राहींना अधिकार असेल.
  • प्रवर्तक व वाटपग्राही यांच्यातील निष्पादित विक्री करारातील अटी व शर्तीनुसार सहमती असलेल्या पाणी, स्वच्छता, वीज व इतर सुविधांसह प्रकल्प पूर्ण होण्यासाठी टप्पे निहाय वेळापत्रक जाणून घेण्याचा वाटपग्राहींना अधिकार असेल.
  • कलम 4 मधील उपकलम 2 मधील परिच्छेद 1 मधील उपपरिच्छेद क अन्वये प्रवर्तकाने सादर केलेल्या घोषणापत्रानुसार वाटपग्राहींना यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा व वाटपग्राहींच्या संस्थेला सामाईक क्षेत्राचा ताबा दावित करण्याचा अधिकार असेल.
  • प्रवर्तक म्हणून व्यवसाय बंद केल्यामुळे किंवा अधिनियमातील अथवा त्या अंतर्गत तयार केलेल्या नियम अथवा विनियमानुसार नोंदणीचे निलंबन किंवा रद्दीकरण झाल्यामुळे विक्री करारातील अटी व शर्तीनुसार प्रवर्तक यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा ताबा देण्यास किंवा अनुपालन करण्यास असमर्थ ठरल्यास वाटपग्राही हे अधिनियमात विहित प्रक्रीयेनुसार नुकसानभरपाई व विहित दराने व्याजासह प्रदान केलेल्या रकमेचा परतावा दावित करण्यासाठी हक्कदार असतील.
  • प्रवर्तकाने यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा प्रत्यक्ष ताबा सोपविल्यावर सामाईक क्षेत्राशी संबंधित व अन्य आवश्यक ते सर्व दस्तऐवज व आराखडे प्राप्त करण्याचा अधिकार वाटपग्राहींना असेल.
  • यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारत घेण्यासाठी विक्री करार करणारा वाटपग्राही हा कलम १३ नुसार सदर विक्री करारात विहित कालमर्यादेत आवश्यक ती प्रदाने विहित पद्धतीने करण्यास जबाबदार असेल व त्याने नोंदणी शुल्क, महानगरपालिकेचे कर, पाणी व वीज शुल्क, देखभाल शुल्क, भूभाडे व अन्य शुल्कातील आपला वाटा योग्य वेळ व ठिकाणी प्रदान करेल.
  • उपकलम ( 6 ) नुसार देय रक्कम किंवा शुल्क प्रदान करण्यात विलंब झाल्यास वाटपग्राहीं विहित दराने व्याज भरण्यास उत्तरदायी असतील.
  • प्रवर्तक व सदर वाटपग्राही याची आपसात सहमती झाल्यास उपकलम ( 6 ) मधील वाटपग्राही यांची उत्तरदायित्वे व उपकलम ( ७ ) मधील व्याजाचे दायित्व कमी करता येऊ शकेल.
  • यथास्थिती प्रत्येक सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा वाटपग्राही वाटपग्राहींची संघटना किंवा संस्था किंवा सहकारी संस्था किंवा त्यांचा महासंघ गठीत करण्यामध्ये सहभागी होईल.
  • यथास्थिती सदर सदनिका, भूखंड किंवा इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र जारी झाल्यावर दोन महिन्यांच्या आत वाटपग्राही यथास्थिती सदर सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा ताबा घेईल.
  • अधिनियमाच्या कलम 17 मधील उपकलम ( 1 ) मधील तरतुदी नुसार यथास्थिती सदर सदनिका, भूखंड किंवा इमारतीच्या अभीहस्तांतरण विलेखाची नोंदणी करण्यासाठी प्रत्येक वाटपग्राही सहभागी होईल.