Skip to main content
Banner

Before Buying the property

आपल्या गरजा निर्धारित केल्यावर महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळाला भेट द्या व प्रकल्प शोध पृष्ठाचा उपयोग करून नोंदणी झालेल्या प्रकल्पातील आपले प्राधान्य असलेल्या प्रकल्पातील व एककाची निवड करा

पहिला टप्पा - महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रकल्प शोध

  • आपल्या गरजेनुसार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर नोंदणी झालेल्या प्रकल्पांचा शोध घ्या.

दुसरा टप्पा - नोंदणी झालेल्या प्रकल्पाचे तपशील जाणून घेण्यासाठी “ तपशील पाहावा “ या अंकुशावर क्लिक करा

आपले आदर्श एकक निर्धारित केल्यावर आता मिळकतीबाबत संशोधन करणे आवश्यक आहे. मिळकतीचे कायदेशीर अधिकार प्रमाणपत्र, वाटप पत्राचा व आदर्श करारनाम्याचा नमुना, मिळकतीशी निगडीत ( वित्तीय व कायदेशीर ) वादविवाद व बोजे, गाळे, इमारती, प्रकल्प, सामाईक क्षेत्रात देऊ केलेल्या सोयी सुविधांची माहिती संकलित करा. वाहतूक, दुकाने, शाळा व आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या अन्य पायाभूत सुविधा जवळपास असल्याची खातरजमा करा. तसेच महाराष्ट्र संपदा नियामक प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेल्या विविध आदेश व परिपत्रकानुसार देखील सोयी सुविधांचा शोध घ्यावा.