Skip to main content
Banner

नोंदणी न झालेल्या प्रकल्पाच्या विरुद्ध तक्रार

  • मुख्यपृष्ठ
  • नोंदणी न झालेल्या प्रकल्पाच्या विरुद्ध तक्रार

जे प्रकल्प विधिवत नोंदणी होणे आवश्यक होते, पण झालेले नाहीत अशा प्रकल्पांची माहिती हाताळण्याची प्रक्रिया महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने दिनांक 24 जून 2017 रोजी विहित केली होती. एखादा विशिष्ट प्रकल्प महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे विधिवत नोंदणी होणे आवश्यक होते, पण झालेले नाहीत असे एखाद्याला वाटत असल्यास सदर कलमाच्या अंतर्गत ती व्यक्ती माहिती सादर करू शकते.

ऑनलाईन माहिती दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रकल्पाचा शोध घेऊन तो प्रकल्प महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी झालेला आहे किंवा कसे, याची पडताळणी करावी. प्रकल्प नोंदणी झालेला नसल्याचे आपल्याला आढळल्यास बिगर नोंदणी प्रकल्पाची माहिती देण्याच्या शिर्षांतर्गत ऑनलाईन अर्ज करून आपण माहिती देणे आवश्यक आहे.

बिगर नोंदणी प्रकल्पांची माहिती देण्यासाठी स्त्रोत माहिती व स्त्रोत तक्रार या दोन पद्धती आहेत.

A)स्त्रोत माहिती

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील बिगर नोंदणी प्रकल्पाची माहिती देण्याच्या शिर्षांतर्गत कोणताही नागरिक / निरीक्ष्य भाषक नोंदणी न झालेल्या स्थावर संपदा प्रकल्पांची माहिती ऑनलाईन अर्ज करून निशुल्क भरू शकतो.

तांत्रिक अधिकाऱ्यांना बिगर नोंदणीची कारणे तपासणे सोपे होण्यासाठी जेवढी माहिती देणे शक्य आहे, तेवढी सदर स्त्रोत माहिती शिषांतर्गत द्यावी.

आपण सर्व तपशील सादर केल्यावर तो एकवेळ संकेतशब्दाच्या माध्यमातून त्याची पडताळणी करू शकता. स्त्रोत माहिती क्रमांक देण्यात येईल. तपासाच्या स्थितीबाबत चौकशी करण्यासाठी सदर स्त्रोत माहिती क्रमांक जपून ठेवावा.

सदर ऑनलाईन स्त्रोत माहिती क्रमांक माहितीच्या अधिक छाननीसाठी तांत्रिक अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येईल. तपास पूर्ण झाल्यावर निरीक्ष्य भाषकाच्या नियंत्रण पट्टावर व संकेत स्थळावर पुढील निर्णय अद्ययावत करण्यात येईल.

प्रकल्पाला ( जमीन, पाणी, वीज मंडळ किंवा तत्सम ) सार्वजनिक किंवा नियोजन प्राधिकरणाकडून काही मंजुऱ्या प्राप्त झाल्या नसल्यास यथोचित कार्यवाही करण्यासाठी सदर प्राधिकरणाना सूचना देण्यात आल्या पाहिजेत.

B)स्त्रोत तक्रा

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील बिगर नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती देण्याच्या शीर्षकांतर्गत उपलब्ध ऑनलाईन अर्ज भरून माहितगार स्त्रोत तक्रार ऑनलाईन दाखल करू शकतो.

प्रकरणी प्राधिकरणाच्या समक्ष तपशील सादर करून माहितगाराला सुनावणीची इच्छा असल्यास त्याने रु ५००० शुल्क भरणा करणे आवश्यक आहे. यशस्वी प्रदानानंतर स्त्रोत तक्रार क्रमांक व्युत्पन्न होईल व तक्रार तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली जाईल.

स्त्रोत तक्रार दाखल केल्यावर माहितगाराने तक्रारीची प्रत प्रतिवादीवर बजावून संबंधित स्त्रोत तक्रारीत स्थिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. बिगर नोंदणी अर्ज स्थिती शीर्षकाच्या अंतर्गत माहितगार बजावलेल्या तक्रारीची स्थिती अद्ययावत करेल.

स्त्रोत तक्रार प्राप्त झाल्यावर तांत्रिक अधिकारी यथोचित प्राधिकरणाच्या समक्ष सुनावणी अनुसूचित करतील. सुनावणीची नोटीस माहितगार व प्रतिवादीच्या नोंदणीकृत ई मेल पत्त्यावर पाठविण्यात येईल..

सुनावणीच्या तपशिलासह तक्रारीची प्रत प्रतिवादीला रीतसर बजावण्यात आल्याचे घोषणापत्र तक्रारदाराने सुनावणीच्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे.

सुनावणी पश्चात प्राधिकरणाचे निर्णय संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील व माहितगाराचा नियंत्रण पट्टावर तसेच महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर सर्वसामान्य जनतेसाठी अद्ययावत करण्यात येईल.